किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला

सोमवार, 11 एप्रिल 2022 (18:12 IST)
किरीट सोमय्या यांच्या अडचणी आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणामुळे वाढल्या आहे. यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला असून नील सोमय्या यांचा अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला असून आता किरीट सोमय्यांना अटक होईल का? असा प्रश्न उभा आहे. अनेकांवर आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या आता स्वतःच अडचणीत आले आहेत. 
 
किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा करण्यात आलेल्या मदतनिधीत घोटाळा करण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरण्याच्या चौकशीसाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. आता जामीन अर्ज फेटाळल्यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती