दादर स्थानकाजवळील हनुमानाच्या मंदिराला पडण्याच्या आदेशावर रेल्वेची बंदी

शनिवार, 14 डिसेंबर 2024 (16:18 IST)
मुंबईतील दादर स्थानकावरील हनुमान मंदिर पाडण्याच्या आदेशाला रेल्वेने स्थगिती दिली. आदित्य ठाकरे शनिवारी या मंदिरात जाऊन पूजा करणार होते.

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेसमोर हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनतर या मंदिरात जाण्यासाठी भाजपच्या नेंत्यांमध्ये स्पर्धा लागली. सध्या रेल्वेने या मंदिराला पाडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. 
शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिराला हटवण्याच्या रेल्वेने दिलेल्या नोटिसावर भाजपवर जोरदार निशाणा साधला. या वर उद्धव ठाकरे म्हणाले, हे कोणते हिंदुत्व आहे.

आता भाजपच्या राजवटीत मंदिरे देखील सुरक्षित नाही. केंद्र आणि राज्य सरकार या प्रकरणी निष्क्रिय आहे. 
4 डिसेंबर रोजी रेल्वेने मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना 'अतिक्रमण' म्हणून नोटीस बजावली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर त्यांच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले आहे.

या मुळे प्रवासी आणि वाहनांच्या वाहतुकीला अडथळा येत आहे. असे नोटीसांत लिहिले होते. मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने सात दिवसांच्या अवधी दिला होता. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती