Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray News: शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की, बांगलादेशात हिंसक हल्ल्यांचा सामना करत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने काय पाऊल उचलले आहे? मुंबईत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आणि ते म्हणाले की, त्यांचे हिंदुत्व केवळ मते गोळा करण्यासाठी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने बजावलेल्या नोटीसचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री म्हणाले की, 80 वर्षे जुने मंदिर पाडण्याचा 'फतवा' काढण्यात आला आहे. गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने मोठ्या प्रमाणात वापरलेल्या “एक हैं तो सेफ हैं” या घोषणेचा समाचार घेत ते म्हणाले की राष्ट्रीय पक्षाच्या राजवटीत मंदिरे देखील सुरक्षित नाहीत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना 5 ऑगस्ट रोजी पदावरून हटवल्यानंतर बांगलादेशमध्ये मंदिरे उद्ध्वस्त केली जात असून हिंदू आणि इतर अल्पसंख्याक गटांना हिंसक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान पळून गेलेल्या शेख हसीना भारतात सुरक्षित आहे, पण शेजारील देशातील हिंदूंचे काय?, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. "पंतप्रधान (नरेंद्र) मोदींनी संसदेत सांगावे की भारत बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलत आहे," असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.