रत्नागिरी जिल्ह्यात नवजात बालकांची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला होमगार्डच्या मध्यस्थीने मुलाची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा हिंदूत्ववादी संघटनांमुळे चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नवजात बालकांची खुलेआम विक्री (child Trafficking) करणारे रॅकेट सक्रीय झाले आहे. हे रॅकेट आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खालावलेल्या कुटूंबाला टार्गेट करते. 14 एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेने 16 एप्रिलला एका मुलाला जन्म दिला होता. या प्रसुतीनंतर त्याच दिवशी या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.