मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल

शनिवार, 6 मार्च 2021 (23:10 IST)
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर सभा घेणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असताना मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आडमुठेपणा दाखवित राजकीय शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी जाहीर सभा घेतली, विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असताना शेख यांनी सभा घेतली. या प्रकरणी असिफ शेख यांच्यासह आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
शेख यांनी शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत मालेगावच्या रौनकाबाद भागामध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन केले गेले नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. यात कोरोनाचे नियम या सभेदरम्यान अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आले होते. यातील धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील माजी आमदार शेख यांनी ही सभा घेतली.कोरोना आणि जमावबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगावमध्ये आसिफ शेख आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती