राजापूर तालुक्यातील बारसू येथील पस्तावित रिफायनरी पकल्पाविरोधात ग्रामस्थांनी छेडलेले आंदोलन गेले पाच-सहा दिवस शांत होते. मात्र शुकवारपासून आंदोलकांनी मिशन सडा आंदोलन सुरू केले असून मोठ्या संख्येने आंदोलक बारसू येथील सड्यावर जमले आहेत. रिफायनरी पकल्पाविरोधात आता करो या मरोची लढाई सुरू झाली असून सर्वेक्षणाचे काम थांबल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
बारसू परिसरात पस्तावित असलेल्या रिफायनरी पकल्पासाठी माती परिक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून त्याला विरोध दर्शविण्यासाठी ग्रामस्थांनी सड्यावर आंदोलन छेडले होते. मात्र मागील शुकवारी आंदोलकांनी मनाई आदेश असतानाही माती परिक्षण असलेल्या ठिकाणी घुसण्याचा पयत्न केल्याने पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर पुढील तीन दिवसांकरीता आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेत आंदोलक माघारी परतले होते. तेव्हापासून रिफायनरी विरोधी आंदोलन शांत होते. मात्र शुकवारपासून मिशन सडा आंदोलन छेडून आर की पार लढा देण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता. त्यानुसार शुकवारी मोठ्या संख्येने आंदोलक जीवनावश्यक वस्तुंसह आंदोलन स्थळी जमा झाले होते. यामध्ये महिला आंदोलकांची उपस्थिती नेहमीपमाणे जास्त दिसत होती. तर मुंबईतूनही मोठ्या संख्येने ग्रामस्थ गावात दाखल झाले असून ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आम्हाला रोजगार नको आणि रिफायनरीही नको.. एकच जिद्द रिफायनरी रद्द.. अशी भूमिका घेवून आम्ही सर्वजण आंदोलनात उतरलो असून पाण गेला तरी हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor