इंदुरीकरांचे व्हिडीओ करण्यास मनाई

बुधवार, 9 मार्च 2022 (13:31 IST)
कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी मोबइल क्लिपचा चांगलाच धसका घेतला असून आपल्या एका कीर्तनाच्या दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोबाइल बंद करण्यास सांगितले. आता त्याचाच हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.  
 
आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्युब वर टाकून अनेक जण पैसे कमवतात. तसेच यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्याचे इंदूरीकर महाराज यांनी सांगितले होते. व्हिडिओ रेकोर्ड करून त्याची कमाई करणाऱ्यांची मुले दिव्यांग म्हणून जन्माला येतील असेही वादग्रस्त व्यक्तव्य त्यांनी केले होते. इंदूरीकर महाराज यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर आता त्यांनी मोबाइलचा धसका घेतला आहे. 
 
मंगळवारी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी बोडखा गावात इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तन सोहळ्यात काहीजणांकडून मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते तेव्हा त्यांनी मोबाइलधारक तरुणांना मोबाइल बंद करण्यास सांगितले. इंदूरीकर महाराजांच्या आवाहनानंतर आयोजकांनी मोबाइल बंद करण्याचे आवाहन केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती