अर्जुनने भंगारातील साहित्यातून चक्क चारचाकी प्रदूषणविरहित ट्रामगाडी बनवली आहे. कोरोना काळात अर्जुनच्या घराचे बांधकाम सुरू होतं. तेव्हा त्याने ग्रीलचे भंगार (वेस्टेज) साहित्य जमवले आणि त्याचे वेल्डिंग करून 'सनी मोपेडचे इंजिन', मारुती वाहनाचे स्टेरिंग आणि सायकलची चार चाके जोडून गाडी बनवली. पहिल्या प्रयत्नात त्यास फारसे यश आले नाही मात्र नंतर त्याने इनोव्हेशन करायचं ठरवलं.
मारुतीचे स्टेरिंग आणून स्टेरिंग रॅक जोडला, मागच्या बाजूला स्प्लेंडरचे शॉकप्सर बसवले आणि त्याला मोपेडची चाके बसवली. मागच्या बाजूला एक्सेल बार आणि मध्यभागी चीन वेल बसवले. मोपेडचे ड्रम वेल लावले आणि मग गाडी चालवून बघितली तेव्हा तोही प्रयत्न फसला नंतर गाडीचं वजन कमी केलं तेव्हा गाडी चालायला लागली. बॉडी कव्हरसाठी पत्रे लावले.