मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मॉरिशसला भेट देणार असून त्यांना राष्ट्रीय दिनाच्या समारंभात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान यांनी स्वतः याची घोषणा केली आहे.तसेच मॉरिशसचे पंतप्रधान यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सभेला संबोधित करताना म्हटले की, "पंतप्रधान मोदींच्या इतक्या व्यस्त वेळापत्रकानंतरही, आपल्याला अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचे आतिथ्य करण्याची संधी मिळणे हे आपल्या देशासाठी खरोखरच एक विशेष सन्मान आहे."