काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारीनेते रमेश चेन्निथला म्हणाले, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करणार नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतरच ठरणार आहे.
पश्चिम बंगालच्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिन्ता व्यक्त केली या वर ते म्हणाले. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल देखील चिंता करावी.
बदलापूरमध्ये जे घडले ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात दुःखदायक आहे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत, राष्ट्रपतींनी याकडेही लक्ष द्यावे. त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. कोलकाताच नाही तर महाराष्ट्रानेही त्यांना पाहावे आणि मत व्यक्त करावे.
महाराजांचा पुतळा कोसळला यावर माफी मागून काहीही होणार नाही.या मागे कोणाचा हात आहे.त्यावर तातडीनं कारवाई करावी. दोषी कोण आहे हे फडणवीसांनी बघावे.