८५ वर्षांच्या वयात उपोषणाची वेळ येणार नाही हीच इच्छा, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
लोकायुक्त कायद्याच्या मसुद्याचा आतापर्यंत झालेला त्यांनी सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आपण उपोषण केले होते. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर ते मिटले.