महाराष्ट्रात पुरुषाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलंय, 'बायकोला साडी नीट घालता येत नाही'

मंगळवार, 17 मे 2022 (23:18 IST)
महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात एका 24 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पत्नीवर नाराज असल्याचे सांगून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचेही पोलिसांनी सांगितले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुकुंदनगर येथील रहिवासी समाधान साबळे यांनी सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली.
 
मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे प्रभारी ब्रम्हा गिरी यांनी सांगितले की, "पुरुषाच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याची पत्नी नीट साडी घालू शकत नाही, नीट चालू शकत नाही किंवा बोलू शकत नाही." अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वीच त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले होते, पुढील तपास सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती