राज्यात अनेक भागात मेघ गर्जनेसह मान्सूनपूर्व सरी कोसळणार

रविवार, 5 जून 2022 (13:22 IST)
सध्या राज्यात जनता उकाड्याने हैराण झाली आहे. सर्वजण पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा पावसाळा दिलासादायक असण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.येत्या 5 दिवसांत राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून मान्सून लवकर राज्यात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून सध्या अनुकूल परिस्थिती नसल्याने मान्सून कर्नाटकच्या कारवार येथेच विसावला आहे. 
राज्यात येत्या पुढील 5 दिवस पावसाचे आगमन होऊन राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

तर राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सह जनतेला उकाड्यापासून सध्या दिलासा नाही. त्यामुळे जनतेला मान्सूनची आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती