काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवर आमचं बारीक लक्ष - उद्धव ठाकरे

रविवार, 5 जून 2022 (10:03 IST)
काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहिल आणि त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात असल्याच्या घटना घडत आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी काश्मीर खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. "काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे." असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
"महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल," असंही ते आपल्या निवेदनात म्हणाले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती