राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का, याचा विचार करावा -चंद्रकांत पाटील

मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (21:29 IST)
राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यावरील प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का, याचा विचार करावा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 
पाटील म्हणाले,अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विधानासाठी माफीचा आग्रह धरला. सत्तार यांनी माफी मागितली आहे. पण माफी मागितल्यावर, दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यावरील गदारोळ संपायला हवा. लोकांना अशा प्रकारची विधाने अजिबात आवडत नाहीत, याचा नेत्यांनी विचार करावा. लोकांना नेत्यांनी विकासावर बोलायला हवे आहे.

Edited by-Ratnadeep Ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती