मुंबई मनपा करणार शुक्रवारपासून प्लास्टिक वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई, परवाने रद्द

गुरूवार, 31 जानेवारी 2019 (14:06 IST)
येत्या शुक्रवारपासून फेरीवाल्यांना प्लॅस्टिकची पिशवी साठी मनपा जोरदार मोहीम राबवणार असून दंड करणार आहे. कारण मुंबई पालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून 1 फेब्रुवारीपासून याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबई मनपाच्या पालिकेच्या विशेष टीमकडून प्रत्येक फेरीवाल्याची तपासणी घेतली जाणार असून प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला जाणार आहे. राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे.  पालिकेच्या माध्यमातून मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू असून, अनेक फेरीवाल्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे समोर येतेय. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्याकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास त्याला ‘ब्लॅक लिस्ट’ करून ‘फेरीवाला परवाना प्रक्रियेतून’ बाद करण्याचा निर्णय या आधीच घेतला आहे. या निर्णयाची 1 फेब्रुवारीपासून कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. तर प्लॅस्टिकविरोधात कारवाई सुरू असतानाही अनेक फेरीवाल्यांकडून ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीच्या कठोर अंमलबजावणी करण्यासाठी 1 फ्रेब्रुवारीपासून फेरीवाल्यांची तपासणी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपआयुक्त विजय बालमवार यांनी दिली. या कारवाईत पालिकेच्या सर्व 24 वॉर्डांमध्ये सहभाग असणार आहे. या साठी 107 इन्स्पेक्टर, 400 सीनियर इन्स्पेक्टर आणि 260 कामगारांच्या टीम तयार आहेत. या टीमच्या माध्यमातून मुंबईत रस्त्यांवर बसलेल्या आणि फिरून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. मुंबईत तर योग्य पद्धतीने ही कारवाई झाली तर रोज हजारो टन प्लास्टिक निर्मिती आणि तिचा वापर थांबेल सोबतच याचा उपयोग नाले न तुंबने, समुद्रात प्लास्टिक न जाणे आणि पर्यावरणाला धोका न होणे यासाठी मदत होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती