कोची ते क्वालालंपूर या विमानाच्या बोर्डिंग प्रक्रियेनंतर, सुरक्षा अधिकाऱ्याने प्रवाश्याला त्याच्या सामानाचे वजन विचारले. यावर त्याने गंमतीने म्हटले की त्यात 'बॉम्ब' आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि पोलिसांना कळवले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे विनोदाने सांगितल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी कोझिकोड येथील रहिवासी या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दुबईला जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
ढाकाहून दुबईला जाणाऱ्या विमान बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचे महाराष्ट्रातील नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानात ३९६ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक अडचणींमुळे विमानाचे स्थलांतर करण्यात आले आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.