8 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सहभागी होणार

बुधवार, 7 डिसेंबर 2022 (23:42 IST)
महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी  8 डिसेम्बर रोजी पिंपरी -चिंचवड बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये छत्रपती संभाजीराजे हे सहभागी होणार आहे. 
 
महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी  8 डिसेम्बर रोजी पिंपरी -चिंचवड बंदची घोषणा केली असून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे दुपारी 12 वाजता पिंपरीत सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन महापुरुष सन्मान समितीचे समन्वयक यांनी दिली आहे. बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या नेतृत्वाखाली बंद होणार आहे. या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, बसपा, एमआयएम , आम आदमी पार्टी संभागी होणार आहे. तसेच विविध पुरोगामी सामाजिक संघटना जसे संभाजी ब्रिगेड , छावा संघटना, मराठा सेवा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, प्रहार, इत्यादी संघटनेचा पाठिंबा आहे. शहरातील ओद्योगिक संस्थान ,सर्व मुस्लिम संघटनांचा बंद ला पाठिंबा आहे. बंद सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत आले. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगण्यात आल्या आहेत. हा बंद पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत असेल. 
 
  Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती