मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणारा पीएफआय नेता मतीन शेखानी फरार झाला आहेत. महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादाबाबत पीएफआयचे नेते मतीन शेखानी यांनी राज ठाकरेंना खुली धमकी देत छेडेंगे तो छोडेंगे नही असे म्हटले होते. मतीन शेखानी यांच्याविरोधात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून मतीन शेखानी फरार आहे. मुंबई पोलिसांची दोन पथके शेखानीचा शोध सुरू केली आहेत.