सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन द्या , सरकारचा आदेश

मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (21:20 IST)
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन  देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीत 89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील 89 हजार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच निर्णयाची मागील अनेक वाट पाहत होते. तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला 45 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निधीतून एसटी अधिकाऱ्यांना पाच हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळीची रक्कम देण्यात येणार आहे.
 
एसटीच्या 89 हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाभ होणार आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5 हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती