लक्ष द्या ; मध्य रेल्वेच्या ‘या’ २८ गाड्या रद्द, १३ गाड्यांच्या मार्गात बदल

शुक्रवार, 23 जुलै 2021 (21:15 IST)
राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. पावसामुळे संपूर्ण मुंबई, कोकणसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाचा फटका रेल्वे गाड्यांवर पडला आहे. भुसावळ विभागातून रेल्वेने २८ गाड्या रद्द, तर १३ गाड्यांचे मार्ग बदलवल्याची माहिती स्थानक संचालक जी.आर.अय्यर यांनी दिलीय.
दरम्यान,  गुरुवारी काही गाड्या भुसावळ जंक्शनवर टर्मिनेट करण्याचा निर्णय झाला. यामुळे गाडीतील प्रवाशांनी गोंधळ घालून गाड्या मुंबईकडे सोडण्याची मागणी केली. मुंबई विभागात सुरू असलेल्या पावसामुळे उंबरमळी स्थानकाजवळ पुलाखालील भराव वाहून गेला. कसाराजवळ रेल्वे लाइनवर मातीचा ढीग पडल्याने अप-डाऊन मार्गावरील गाड्यांना फटका बसला. यामुळे गुरूवारी मुंबईकडून येणार्‍या गाड्यांचे मार्ग बदलवण्यात आले.  
 
अशा आहेत रद्द केलेल्या गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनन्स-गोरखपूर, एलटीटी-हावडा, मुंबई-शालिमार, नांदेड-मुंबई, मुंबई-नांदेड, एलटीटी-छपरा, एलटीटी-जयनगर, एलटीटी-बनारस, एलटीटी- गोरखपूर, मुंबई-नागपूर या गाड्या गुरुवारी रद्द झाल्या. जयनगर-एलटीटी ही २० जुलैला निघालेली गाडी ईगतपुरी, बनारस-एलटीटी कसारा, अमृतसर-मुंबई आणि गोरखपूर-एलटीटी ही गाडी देखील कसारा स्थानकावर रद्द करण्यात आली. २० जुलैला निघालेली हावडा-मुंबई ईगतपुरी, २१ जुलैला निघालेली गोंदिया-मुंबई चाळीसगाव, अमरावती-मुंबई मनमाड आणि नागपूर-मुंबई, हावडा-मुंबई, लखनऊ-मुंबई या गाड्या नाशिकला रद्द केली. तसेच अमरावती- मुंबई आणि एलटीटीवरून सुटणारी हरिद्वार गाडी देखील रद्द केली. मुंबई-बनारस ही गाडी शुक्रवारी (दि.२३) रद्द झाली. तर भुसावळात जबलपूर-मुंबई, हावडा-मुंबई, मुंबई-जबलपूर, गोरखपूर-एलटीटी, एलटीटी-गोरखपूर ही गाडी भुसावळला रद्द करण्यात आली.
 
मार्गात बदल केलेल्या गाड्या
पावसामुळे मुंबईतून येणार्‍या व जाणार्‍या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. यात मुंबई-हावडा या तीन गाड्या वसई, नंदूरबार, जळगाव मार्गे वळवण्यात आल्या. एलटीटी-मंडुआडीह, पठाणकोट एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, पाटीलपुत्र एक्स्प्रेस, एलटीटी-पुरी या गाड्या ठाणे, वसई, नंदूरबार, जळगावमार्गे वळवल्यात. महानगरी, पंजाब मेल, राजधानी एक्स्प्रेस या मुंबईकडे जाणार्‍या गाड्या जळगाव, नंदूरबार, वसई, तर मंगला एक्स्प्रेस ही गाडी मनमाड, दौंड, पुणे मार्गे वळवली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती