ठाणे : पॅथॉलॉजी लॅब मालकाची ४२.३५ लाख रुपयांना फसवणूक

बुधवार, 5 मार्च 2025 (16:02 IST)
Thane News: महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये पॅथॉलॉजी लॅब मालकाची ४२.३५ लाख रुपयांची फसवणूक झाली.  ठाण्यातील पोलिसांनी सांगितले की, एका फसवणूक करणाऱ्याने बेलावली येथील रहिवासी असलेल्या पीडितेला फोन केला आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले आणि चांगले परताव्याचे आश्वासन दिले.
ALSO READ: मुलाने मोबाईमध्ये रिचार्ज केला नाही, महिलेने स्वतःला पेटवून घेतले
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडितेला काही लिंक्स दिल्या आणि त्याद्वारे पीडितेने जून २०२३ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान ४२.३५ लाख रुपयांचा व्यवहार केला. आरोपीने पीडितेला कोणताही फायदा दिला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच पीडितेने सोमवारी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणी पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ALSO READ: अबू आझमीला उत्तर प्रदेशला पाठवा, औरंगजेब वादावर मुख्यमंत्री योगी यांनी दिली प्रतिक्रिया
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: सपा आमदार अबू आझमी विधानसभेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत निलंबित

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती