शेतीच्या वादामुळे मुलांच्या भांडणाला कंटाळू आई- वडिलांनी संपवले जीवन

बुधवार, 4 मे 2022 (18:01 IST)
शेती आणि संपत्ती या नेहमी धोकादायक आहे. या मुळे केव्हा नात्यात दुरावा येईल काही सांगता येत नाही. शेती आणि संपत्ती मुळे माणूस आपसातील नातं देखील विसरतो. आणि एक मेकांच्या जीवावर देखील उठतो.या मुळे होणारा वाद घरातील कलहाचे कारण बनतो. पण दोघांच्या वादामुळे घरातील माणसांची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना कोणीच करत नाही. त्यांना होणारा मनस्ताप कोणाला कळत नाही. सततच्या दोन्ही मुलांमध्ये होणारा शेती आणि संपत्तीच्या वादाला कंटाळून मुलांच्या आई-वडिलांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना खंडाळा येथे घडली आहे. 
 
काबाड कष्ट करून ज्या शेतीची जोपासना केली संपत्ती जमविली. त्याच संपत्तीसाठी दोन्ही मुलं एकमेकांच्या जीवावर उठलेली पाहून मुलांच्या वादाला कंटाळून वृद्ध शेतकरी दाम्पत्याने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. खंडाळा येथील गोरखनाथ हरिचंद्र गाडेकर(57)आणि त्यांची पत्नी लताबाई गाडेकर(57) असे या मयत दांपत्याची नावे आहेत. 
 
या गाडेकर दाम्पत्याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. गाडेकर दाम्पत्यांनी मोठ्या कष्टाने आपला संसार मांडला. आणि शेती आणि संपत्ती जमविली. त्यांनी आपल्या मुलांची लग्न करून दिली आणि सर्व कर्तव्यातून मुक्त झाले. त्यांच्याकडे 18 एकर शेत होती. त्यांनी दोन्ही मुले गणेश आणि ज्ञानेश्वरच्या नावानी गणेश ला सात एकर आणि ज्ञानेश्वर ला आठ एकर शेती दिली. तर उर्वरित शेती त्यांनी स्वतःच्या नावावर ठेवली. 
 
हे दाम्पत्य लहान मुलाकडे ज्ञानेश्वर कडे राहायला होते. ज्ञानेश्वर ने त्याच्या आत्याकडून सात एकर जमीन वर्षभरापूर्वी विकत घेतली पण या जमिनीवर गणेश सात ते आठ वर्षांपासून बटाईने करत असता .दोघा भावांमध्ये वाद सुरु झाले. ज्ञानेश्वरने या जमिनीत कांद्याची लागवण केली होती.गणेश त्यातून कांदे काढून घ्यायचा. यावर ज्ञानेश्वरने  गणेश ला समज देऊन देखील समजत नसे.या कारणामुळे दोघात मारामारी देखील झाली आणि प्रकरण पोलिसात पोहोचले.
 
दोघांना त्यांच्या आईवडिलांनी समजावले तरीही दोघा भावात शेतीसाठीचे वाद सुरु होते.दोन्ही मुलांच्या भांडणाचा त्रास या दांपत्याला होत होता. गावात देखील त्यांच्या घराची बदनामी होत असल्याचा त्रासाला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेत गुरुवारी दुचाकी वरून गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक गाठले आणि स्वतःच्या चपला काढून त्यावर स्वतःची नावे लिहिली आणि खंडाळा येथे राहणाऱ्या आपल्या मेव्हणान्या फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले त्यांनी त्यांना असे करू नका असे समजाविले पण त्यांनी गोदावरीच्या नदीपात्रात उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. मुलांचा शेती संपत्तीचा वाद कधीतरी थांबेल पण त्यांना आईवडील कधीच दिसणार नाही. याचा पश्चाताप नेहमी होत राहील. खंडाळात गाडेकर दांपत्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती