भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर करण्यात आले. सूमारे 350 वर्षांची परंपरा असलेली ही प्रथा शेतकऱ्यांमध्ये विश्वासहार्य आहे. भेंडवळची ही घट मांडणी 3 मे रोजी संध्याकाळी ही घटमांडणी पार पडली. या घट मांडणीत शेती, पाऊस, आरोग्य आणि राजकारणाविषयी भाकित केले जाते.
भेंडवळ घटमांडणीनुसार, यंदा जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस असेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. यंदाही बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. दोन वर्ष सामना करत असलेल्या कोरोनाचा यंदा नायनाट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आला आहे.
पावसाबाबत भविष्यवाणी –
जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस पडणार आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असेल.
अवकाळीची चिंता वर्षभर शेतकऱ्यांना सतावणार आहे.
पिकांबाबतची भविष्यवाणी –
कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील.
वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिकं मध्यम स्वरूपात येतील.
बळीराजाला पिकांना भाव न मिळाल्यामुळे चिंता जाणवेल
लवकर येणाऱ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
रोगराईबद्दल भविष्यवाणी –
यावर्षी रोगराई राहणार नाही
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे