राज्यात मुसळधार पावसाचा उद्रेक, 200 हून अधिक जणांची सुखरूप सुटका, पिकांचे नुकसान

मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (18:26 IST)
राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसाचा उद्रेक आहे. अनेक शहरात पावसाची संतत धार सुरु आहे. सर्वत्र पाणीच पाणी आहे. मराठवाड्यातलं  हिंगोली जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी 200 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तर 90 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. 

तर नांदेड जिल्ह्यात दोन लाख हेक्टर हुन अधिक जमीन बाधित झाली आहे.मराठवाड्यात रविवारपासून मुसळधार पावसाने 25 जनावरे दगावली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड, हदगाव, देगलूर, मुदखेड, कंधार, लोहा, नायगाव येथे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. 

संततधार पावसामुळे नांदेड शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला. वासरणी येथील पंचवटी साईबाबा कमान परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचले आणि तेथे राहणाऱ्या दोघांना वाचवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील 218 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सोमवारी 87जणांची सुटका करण्यात आली आहे. हिंगोलीच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की, सारंगवाडी गावात एका 10 वर्षाच्या मुलासह दोघांचा बुडून मृत्यू झाला. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी बुडून मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आला.
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती