१०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीं मतमोजणी सुरू असे आहेत निकाल
बुधवार, 19 जानेवारी 2022 (15:14 IST)
राज्यात ओबीसी आरक्षणा विना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 टक्के तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, निवडणुकीतील या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.
अहमदनगरच्या अकोले नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता
भाजप – १२ जागेवर विजयी
काँग्रेस – १ जागेवरी विजयी
राष्ट्रवादी – २ जागेवर विजयी
गोंदियाः जिल्हा परिषद निवडणूक निकालाचा पहिला कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने, नेहा तुरकर १२०० मतांनी आघाडीवरभंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विजयी खाते; देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता,
बुलडाणाः मोताळा नगरपंचायतीत १२ जागांवर काँग्रेस विजयी, सेना ४ , राष्ट्रवादी १ जागेवर विजयी
यवतमाळः राळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये मध्ये काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी
तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय
सिंधुदुर्गच्या कुडाळची सत्ता आघाडीने नारायण राणेंकडून हिसकावली आहे.
शिवसेना – ७ जागेवर विजय
काँग्रेस – २ जागेवर विजय
भाजप – ८ जागेवर विजय
रायगडच्या पोलादपूरवर शिवसेनेचा झेंडा
शिवसेना – १० जागांवर विजयी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस – ६ जागांवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी
औरंगाबादच्या सोयगावमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का. ११ पैकी ८ जागांवर शिवसेना विजयी
राज्यमंत्री विश्वजीत कदमांच्या कडेगाव नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे.
भाजप – १० जागेवर विजय
काँग्रेस – ६ जागेवर विजय
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग 16 अ चा निकाल,
महेंद्र चंडाले- 535
अमोल गवळी- 3434
सुरेश सावंत -587
तौफिक शिकलगार- 7429
उमरफारूक ककमरी :21
समीर सय्यद – 18
काँग्रेसचे तौफिक शिकलगार 3995 मतांनी विजयी
नाशिक : नगरपंचायत निवडणूक
सुरगाणा – 17 जागा निकाल जाहिर
शिवसेना – ६ जागेवर विजय
भाजप – ०८ जागेवर विजय
माकप – ०२ जागेवर विजय
राष्ट्रवादी – ०१ जागेवर विजय
नगरपंचायतीचे नाव – निफाड
एकुण जागा – 17
शिवसेना- 07 जागेवर विजय
काँग्रेस-01 जागेवर विजय
राष्ट्रवादी-01 जागेवर विजय
शहर विकास आघाडी – 01 जागेवर विजय
बसपा- 01 जागेवर विजय
इतर(अपक्ष)-01 जागेवर विजय
देवगड – भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव सहा जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर भाजपला पाच जागा मिळवल्या आहेत. संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्याच्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला.
अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीत काँग्रेस विजयी झाली आहे.
काँग्रेस – १२ जागा विजयी
शिवसेना – ४ जागा विजयी
वंचित – १ जाग विजयी
संग्रामपूर नगरपंचायत बच्चू कडू यांच्या प्रहारची एकहाती सत्ता मिळवली आहे. बच्चू कडूंनी भाजपच्या संजय कुटेंची धोबीपछाड केली आहे. प्रहार जनशक्तीचा १२ जागांवर विजय मिळाला आहे.