गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी महाराष्ट्रातील गावागावांतील सर्वच तरुणांना भूरळ घातली आहे. पण दुसरीकडे गौतमीच्या नृत्याने काही महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. लावणी ही लोककला आहे. लोककलेत अश्लिलता येत नाही. लावणीकडे बघण्याचा समाजातील महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी, लावणी सादर करताना त्यात अश्लीलपणा करू नये असे म्हणत तिच्यावर अनेकदा टीका करण्यात आली आहे.