नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

मंगळवार, 24 जानेवारी 2023 (11:30 IST)
आपल्या नृत्याने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतमी पाटीलवर अश्लील डान्स केल्याचे आरोप केल्यावर प्रतिभा शेलार यांनी गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल केली असूंन सातारा कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. 
 
 
गौतमीने आपल्यावरील लागलेले आरोप फेटाळून निर्दोष असल्याचा दावा केला. पूर्वी मी काही चूक केली होती आता अशी चूक करत नसून माझे कार्यक्रम व्यवस्थित सुरु असल्याचे गौतमी म्हणाली. चूक असल्यास माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करा. चूक नसताना माझ्या कार्यक्रमावर बंदी घालणे हे अन्याय कारक आहे. 

गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर आहे. तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल दिल्यावर व्हायरल झाल्यावर ती आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करते लहान कपडे घालते, लावणीत अश्लील हावभाव येत नाही. लावणीच्या नावाखाली अश्लीलता दाखवते. गौतमीने लावणीची संस्कृती जपावी अशी टीका तिच्यावर करण्यात आली.
त्यावर तिने म्हटले की, मी एक कलाकार आहे मी लोकांसमोर माझी कला सादर करते आणि माझ्यावर लोक प्रेम करतात माझा कार्यक्रम बघायला येतात. या वर कोणी काय बोलावे हा ज्याचा  त्याचा खासगी प्रश्न आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती