गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच तिच्या डान्स स्टेपमुळे चर्चेत असते. यावेळी सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा नृत्याचा तडाका पाहायला मिळाला. यावेळी चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सोलापूरच्या माळशिरस मधल्या नातेपुतेमध्ये गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठी गर्दी केली होती.