राज्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता असून 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
येत्या 24 तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांत ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ येथे यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी कामानिमित्तच बाहेर पडावे असे आवाहन देण्यात आले आहे.