रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला,वाहतूक विस्कळीत

सोमवार, 15 जुलै 2024 (10:04 IST)
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्या, नाले धरणे तुडुंब वाहत आहे.  रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला रत्नागिरीतील खेड तालुक्यात शिवतर- नामदारे वाडी रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे.रस्ता वाहून गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाने मध्य राष्ट्रातील अनेक भागात 16 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. 
हवामान खात्यानुसार,  16 जुलैपर्यंत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवार आणि सोमवारी कर्नाटक, केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.यासोबतच लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
15, 16 आणि 17 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तर आणि पूर्व भागात पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते. अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नद्या, नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास होत आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती