राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआऊट, शरद पवार म्हणाले विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही

बुधवार, 3 जुलै 2024 (21:46 IST)
लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज झाले. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला. सभागृहात त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
राज्यसभेतून विरोधकांचे वॉकआउटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, 

मल्लिकार्जुन खर्गे हे घटनात्मक पदावर असून पंतप्रधान असो वा सभागृह खर्गे यांचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण या कडे आज दुर्लक्ष करण्यात आले. संपूर्ण विरोधक त्यांच्या सोबत असून आम्ही सभागृहातून वॉकआउट केले. 

पंतप्रधान मोदी आज चर्चेला उत्तर देत असताना सर्वप्रथम विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापती जगदीप धनखर यांच्याकडे बोलण्याची परवानगी मागितली. सभापतींकडे अनेकवेळा परवानगी मागितली होती, मात्र त्यांनी त्यांना बोलू दिले नाही, असा विरोधकांचा दावा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या घोषणाबाजीत पंतप्रधान मोदींनी भाषण सुरू ठेवताच खर्गे यांच्यासह काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. 

या प्रकारणांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “आम्ही बाहेर आलो कारण पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहाला संबोधित करत होते आणि त्यांनी सभागृहाला काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या. खोटे बोलणे आणि सत्याच्या पलीकडे बोलणे ही त्यांची सवय आहे. मला एवढेच सांगायचे होते की तुम्ही संविधान बनवले नाही, तुम्ही संविधानाच्या विरोधात आहात. मला हे प्रकरण त्यांच्यासमोर सभागृहात मांडायचे होते.”पण मला बोलू दिले नाही म्हणून आम्ही बाहेर निघालो.

या वर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, खोटे पसरवणाऱ्यांमध्ये सत्य ऐकण्याची ताकद नाही हे देश पाहत आहे. ज्यांच्यात सत्याला सामोरे जाण्याची हिंमत नाही, त्यांच्यात या चर्चेत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्याची हिंमत नाही. ते उच्च सभागृहाच्या गौरवशाली परंपरेचा.अवमान करत आहे. 

Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती