जीबीएस ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय नसांवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पाय आणि/किंवा हातांमध्ये संवेदना कमी होते, तसेच गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.
"आतापर्यंत एकूण139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 39 रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत आणि इतर 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत," असे राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकूण नऊ मृत्यू जीबीएसमुळे झाले आहेत. यापैकी चार जणांचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याची पुष्टी झाली, तर इतर पाच जणांचा मृत्यू या आजाराने झाल्याचा संशय आहे, असे त्यात म्हटले आहे