गावकरी व शेतकऱयांना डिजिटल सही असलेला सातबारा मिळण्यास सुरुवात झाली आहे . पहिल्या टप्प्यात राज्यातील ४० हजार गावांतील सातबारे डिजिटल झाले आहेत. त्यापैकी आठ लाख सातबारांवर डिजिटल सही झाली असून १ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील अडीच कोटी सातबारा शेतकऱयांच्या हाती मिळतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.