आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले, राज्य मंत्रिमंडळात मंजुरी

शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (12:26 IST)
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता  पुण्यश्लोका अहिल्यादेवींच्या नावावर करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून आता अहमदनगर अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार. 

महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी आनंद व्यक्त करत म्हणाले, यंदा पुण्यश्लोका अहिल्यादेवींची 300 वी जयंती असून ही ऐतिहासिक घटना घडली.

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोका अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी गेला काही वर्षांपासून केली जात होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे अहिल्या देवी जयंतीच्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्याबाई नगर  ठेवण्याची घोषणा केली असून नंतर या प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकार आव राज्यसरकारशी चर्चा केली. 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाव बदलण्याच्या प्रस्तावाला तातडीनं मंजुरी देण्याची विनंती केली. या पूर्वी रेल्वे मंत्रालयने राज्य आणि जिल्हा प्रशासनाला अहिल्यानगर या नावाला हरकत नसल्याचे कळवले.
 
केंद्र सरकार ने नाव बदलण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आता अहमदनगर जिल्हा अधिकृतपणे अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार.
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती