महायुती जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या समोर येत आहे. या मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप 150 ते 160 जागांवर निवडणुका लढवणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 85 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 40 ते 45 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.