वाशी टोल नाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरे यांना नोटीस

गुरूवार, 28 जानेवारी 2021 (21:23 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून वाशी टोल नाका तोडफोडप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. 
 
वाशी इथे 26 जानेवारी 2014 रोजी मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं. त्या भाषणात टोल नाके बंद करण्याचा उल्लेख होता. त्यानंतर नवी मुंबईमध्ये  मनसे  शहर अध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्त्यांनी  वाशी टोल नाका फोडला होता. टोलनाका फोडल्या प्रकरणी नसे कार्यकर्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वाशी न्यायालयाकडून आता नोटीस पाठवण्यात आली आहे. राज ठाकरे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती