सायंकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही
सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (07:40 IST)
भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज (दि. ६ ऑगस्ट ) संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:
हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४५७ क्युमेक्स विसर्ग
गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ३१२८.३५ क्युमेक्स विसर्ग
भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.०८ क्युमेक्स विसर्ग
दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग
दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आत्तापर्यंत ३६ क्युमेक्स विसर्ग
राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग
चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३१ क्युमेक्स विसर्ग
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी पहाटे ३:५३ वाजता व दुपारी ३: ५६ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.९ मीटर आणि दुपारी ४.५ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.
वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.
नागरिकांनी आपत्तीं चा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.
राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे: