तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे संप आणि कोरोना काळात झालेल्या नुकसानी साठी ख्रर्च कपातीच्या योजनेत नवीन भरती करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. विलीनीकरण करण्याच्या बाबतीत नुक्त्यातच त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात महामंडळाच्या नव्या नोकरीभरतीवरील निर्बंध लावण्याचा उल्लेख स्पष्ट केला आहे.
या संदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, जो पर्यंत एसटी महामंडळाचा फायदा होत नाही तो पर्यंत नवी भरती होणार नाही. सध्या नवीन बसेस खरेदी करताना सीएनजी इंधनाचा वापर करून नवीन बस भाडे तत्वावर सुरु करण्यासाठी नवीन भरतीवर बंदी घालण्यात आली आहे.