नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारमधील एकही नेता गेला नाही

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (21:46 IST)
राज्य सरकारने अजून दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारमधील एकही नेता गेला नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच खासदार भावना गवळी यांच्या ईडी चौकशीवरुनही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने मदत अद्यपही केली नाही. मदत लांब विचारपूस केली तरी आर्धे प्रश्न सुटतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही बाहेर पडले नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यामुळे त्यांनी आवाज उठवला आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ केला पाहिजे. पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर केली पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो जीआर काढला आहे. त्या जी आरची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या जीआरमुळे कोणत्याही शेतकऱ्याची मागणी शिल्लक राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा जीआर काढण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती