मोठी भविष्यवाणी भाजपा मित्र पक्ष एनडीए सत्तेत येणार मात्र नरेद्र मोदी नाहीतर हा नेता प्रधानमंत्री होणार

लोकसभा निवडणुका जवळ येत असून सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये भाजपा हा सत्तेतील सर्वात मोठा पक्ष सत्ता पुन्हा मिळवायला प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष कॉंग्रेस, बसपा, सपा , राष्ट्रवादी हे देखील निवडणुकीत जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल यासाठी अनेक सर्वे होत असून त्यातून विविध आकडेवारी प्रसिद्ध होत आहे. यावेळची लोकसभा मोठ्या प्रमाणात चुरशीची होणार आहे. देश पातळीवर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे चित्र आहे.
 
मात्र या सर्वाना फाटा देत नवीनच घोषणा अर्थात भविष्यवाणी केली गेली आहे. होय महाराष्ट्रातील अमरावती येथे ज्योतिष संमेलन नुकतेच पार पडले आहे. यामध्ये आगामी निवडणुका आणि देशाचा प्रधानमंत्री आणि केंद्रातील सत्तेत येणार पक्ष याबद्दल मोठी आणि महत्वपूर्ण भविष्यवाणी केली गेली आहे. मध्य प्रदेश ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिष विश्वविद्यालयचे अध्यक्ष डॉ भूपेश गाडगे यांनी महत्वपूर्ण भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या नुसार २०१४ साला प्रमाणे भाजपा पक्ष पूर्ण जादू दाखवू शकणार नाही. उलट त्यांची पीछेहाट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपला मोठा फटका बसणार आहे.
 
यानुसार भाजप पुन्हा सत्तेत येणार असली तरी नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचे भाकित केले आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या जागी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधान पदासाठी निवड होणार असल्याचा दावा गाडगे यांनी केला आहे.
 
गाडगे म्हणतात की ‘भाजपला 2014 प्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तितके यश मिळणार नाही. मात्र मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सत्तेवर येईल. मात्र ज्या मित्र पक्षांच्या मदतीने भाजपला सत्ता मिळाली आहे त्या मित्रपक्षांमुळे मोदींना पंतप्रधानपद सोडावे लागेल. मित्र पक्षांच्या दबाव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात येईल’, असा दावा भूपेश गाडगे यांनी केला आहे.
 
पुढे गाडगे म्हणतात की सत्ता एनडीए ची येणार आहे. राज्यात शिवसेना मोठा पक्ष म्हणून समोर येईल आणि येथे भाजपला त्यांचा मुख्यमंत्री बसवता येणार नाही तर उलट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मोठा नेता म्हणून समोर येणार आहे. आणि त्यामुळे शिवसेना त्यांचा मुख्यमंत्री बनवणार आहे, राज्यात सध्या शिवसेना भाजपा विरोधात अनेकदा भूमिका घेतांना दिसत आहे. त्यामुळे भविष्यवाणी नुसार केंद्रात सर्व समावेशक असे एनडीए ची सत्ता आणि नितीन गडकरी प्रधानमंत्री तर राज्यात शिवसेना मुख्यमंत्री निवडणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती