राज्यात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पाऊस पडत आहे. आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नवी मुंबई आणि ठाणे परिसरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही विशिष्ट इशारा देण्यात आलेला नाही, परंतु दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना छत्री सोबत ठेवण्याचा आणि अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.