नीतेश राणे यांनी ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले

बुधवार, 7 जुलै 2021 (22:13 IST)
राज्य सरकारवर टीका करताना भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना चुकीचं विधान केलं. नीतेश राणेंनी आलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ट्विट करून खुलासा केला आहे. नीतेश राणे यांनी  ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले आहेत.
 
नीतेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. 
 
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. यामध्ये भाग घेताना अनेक आमदारांनी सरकारवर टीका केली. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सातत्यानं लक्ष्य करणाऱ्या नीतेश राणे यांनाही प्रति विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी नीतेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी बोलताना नीतेश राणेंचा तोल गेला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती