नितेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसां विषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. याबाबत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारले असता नितेश राणे वेडा आमदार असून, त्यांना फार महत्त्व देऊ नये. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्याविषयी म्हणाले की, नितेश राणे यांच्यावर कारवाई होऊ शकते, मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करावे व सोडून द्यावे. एक वेडा आमदार, खासदार बोलतोय असे म्हणावे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या बेताल वक्तव्याचा कोणताही परिणाम लोकांवर आणि समाजावर होत नाही. त्याकडे फार लक्ष देऊ नये, असे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगितले.