२६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत नाईट लाईफ

Webdunia
२६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या बैठकीला मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. तसंच हॉटेल आणि मॉल मालकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला हिरवा कंदील मिळाला आहे. 
 
हे सर्व सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर हॉटेल व्यावसायिक, मॉल्सचे प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाईट लाईफचा आढावा बैठक घेतली.

संबंधित माहिती

पुढील लेख