महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या ट्विट वरून वाद होताच त्यांनी ते ट्विट उडवले आणि आता माझ्या ट्वीटचा चुकीचा अर्थ लावला जातोय हो, असा टाहो फोडण्यास सुरूवात केली. मुळात चौधरींचे ट्वीट तसे १७ मे रोजीचे आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता ज्या रस्त्यांना, संस्थांना गांधींचे नाव दिले ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत. एवढेच नाही तर नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे! असे त्यांचे मूळ ट्वीट आहे.