पुण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (16:39 IST)
पुण्यात पुढील पाचही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात ५१ ते ७५ टक्के पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुण्यात यंदाच्या पावसाळ्यातील एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने बुधवारी गाठला. एक  जूनपासून ते २५ सप्टेंबरपर्यंत शहरात १०१८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
 
परतीच्या पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे.  पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती