शरद पवारांवरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही: मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ठाणे: शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ही कारवाई पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असे म्हणणं चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
 
शिखर बँक घोटाळा प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून टीकेची झोड उठते आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई ईडीने केली आहे.
 
रु १०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातली दखल ही ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा एफआयर करत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागतं आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, या प्रकारचे आरोप कालपासून होत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती