शाळांसाठी नवीन नियमावली, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (12:16 IST)
येत्या 1 डिसेंबर पासून राज्यात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरु होणार आहे. या साठी आरोग्यविभागाच्या वतीनं काही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे शाळा, विद्यार्थी, पालकांनी पालन करून आपल्या पाल्याची आणि इतरांची काळजी घ्यावी.
या मार्गदर्शन सूचनेनुसार -
* दोन व्यक्तींमध्ये किमान सहाफूटाचे अंतर राखणे आवश्यक
* प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक.
* वारंवार हात धुणे आवश्यक.
* सेनेटाईझरचा वापर करणे आवश्यक.
* शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
* शाळेत शिकतांना किंवा खोकताना काळजी घ्यावी.
* पाल्य आजारी असल्यास शाळेत पाठवू नये .
* वर्ग सेनेटाईझ करणे आवश्यक आहे.
* कोरोनाबाधित असलेला विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय असावी.
* शाळेची स्वछता नियमित करावी.
* शाळेत पाण्याची मुबलक व्यवस्था करावी.
* शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामूहिक प्रार्थना घेणे टाळावे.
* शाळा परिसराची स्वछता नियमितपणे केली जावी.
* कंटेनमेंट क्षेत्रातील शाळा उघडू नये.
* शाळेतील वाहनांमध्ये मुलांची गर्दी होऊ नये.
* शाळेतील बायोमेट्रिक उपस्थिती पद्धत टाळावी.
* कोरोनाची लक्षणे दिसली तर पालक आणि वैद्यकीय सुविधा केंद्रांना सूचना द्यावी.
* कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची यादी करावी.
* संबंधित सहवासितांना दोन आठवडे होम क्वारंटाईन करावे.
* मैदानावर प्रार्थनास्थळी सामाजिक अंतराची काळजी घेत खुणा आखाव्यात .