शरद पवारांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, सिल्वर ओकवरील पाच जणांना कोरोनाची लागण

सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (13:43 IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत.
 
पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक निवासस्थानी करोनाने शिरकाव केला असून येथील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही करोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
शरद पवार यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं असून त्यांनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.
 
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक पॉझिटिव्ह असून ते बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असताना त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे.
 
दरम्यान शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. ते अत्यंत सुरक्षित आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती